बेळगाव : भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळच्या वतीने कुकडोळी गाव दत्तक घेण्यात आले आहे. कुकडोळी आदर्श ग्राम निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्यसभा सदस्य ” इराणा कडाडी यांच्या अनुदानातून दहा लाख रुपये व्यायाम शाळेसाठी मंजूर करण्यात आले आहेत.
आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी श्री. इराणा कडाडी यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना इराणा कडाडी म्हणाले, माझ्याकडे अनेक जण मंदिरासाठी फंड द्यावा यासाठी येत असतात. माझ्या मते असलेली मंदिरे स्वच्छ ठेवून भक्तिभावाने पूजा करून त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. त्याचबरोबर मनुष्य जन्मल्यानंतर त्याला अन्न लागते, चांगले आरोग्य लागते, चांगल्या शिक्षणाची गरज आहे आणि म्हणूनच मी जास्तीत जास्त ग्रंथालय निर्माण करणे व व्यायाम शाळा निर्माण करणे यासाठी अनुदान देत आहे. कुकडोळी ग्रामस्थांनी योग्य विचार करून व्यायाम शाळा बांधायचा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.
तरुणांनी व्यसनापासून लांब राहून आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे चांगले शिक्षण घ्यावे जेणेकरून सुदृढ आणि शिक्षित भावी पिढी निर्माण होईल असे उद्गार त्यांनी काढले.
याप्रसंगी धनंजय जाधव बोलताना म्हणाले, कुकडोळी गाव भाजपा बेळगाव ग्रामीणच्या वतीने दत्तक घेण्यात आले आहे. येत्या काळामध्ये या गावांमध्ये नक्कीच आम्ही परिवर्तन करून दाखवूया हे आदर्श ग्राम निर्मिती करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
याप्रसंगी मंडळ सरचिटणीस पंकज घाडी, बसवराज दमणगी, मंडळ सेक्रेटरी चेतन अंगडी, अण्णापा लखमोजी, चंद्राप्पा इटगी, शिवाप्पा भैरोजी, चंनमल्लय्या आजनवर, ग्रामपंचायत अध्यक्षा करेमा उच्चनावर, ग्रामपंचायत सदस्य रेखा बसर्गी, निलवा इटगी, भाजपा कार्यालय चिटणीस नारायण पाटील तसेच कॉन्ट्रॅक्टर शिवाजी चलवेटकर, बागेवाडी महाशक्ती प्रमुख सिद्धाप्पा हुकेरी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta