
बेळगाव : समादेवी गल्ली, बेळगांव येथील समादेवी संस्थान वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना व वैश्यवाणी महिला मंडळातर्फे रविवारी (ता. २३) सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘गंगाधरराव शानभाग हॉल’ (बिस्किट महादेव मंदिर) गणेशपूर रस्ता येथे वैश्यवाणी समाजाचा वधू-वर मेळावा आयोजित केला आहे. रविवारी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत वधू-वर नोंदणी, ९ ते १० अल्पोपहार, १० ते ११.३० वाजता मेळाव्याचे उद्घाटन, ११.३० ते दुपारी १ वाजता वधू-वर मेळाव्याचे पहिले सत्र, दुपारी १ ते १.३० स्नेहभोजन, १.३० ते ५ वधू-वर मेळाव्याचे दुसरे सत्र व आभार. वधू-वरांनी फोटो व जन्मपत्रिका आणावी. अधिक माहितीसाठी सुरेश पिळणकर, अमित कुडतूरकर, दत्ता कणबर्गी यांच्याशी संपर्क साधावा.

Belgaum Varta Belgaum Varta