बेळगाव : राजहंसगडला पाणीटंचाई होऊ नये म्हणून सरकारने अनेक योजना राबवून कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत, या योजना फक्त कागदावरच राहिल्या प्रत्यक्षात मात्र येथील जनतेला पाणीटंचाईला समोर जावं लागत आहे.
राजहंगड येथे पाण्याचा कोणताही स्त्रोत नाही सरकारने येथील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जलनिर्मल योजना राबवली या योजनेसाठी तब्बल 50 लाख रुपये खर्च करण्यात आले त्याचबरोबरगेल्या वर्षी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 1 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आले व घरोघरी 24 तास पाणी पुरवठा होईल असे सांगण्यातआले परंतु प्रत्यक्षात ही योजना कूच कमी ठरलीआहे. गावात सध्या चार ते पाच दिवसातून पाणीपुरवठा केलाजातआहे ते फक्त अर्धातास एवढ्यावरच येथील जनतेलाअवलंबूनराहावं लागतआहे फेब्रुवारीच्यापहिल्या आठवड्यापासूनच पाण्याचे चटके येथील जनतेला बसू लागले आहेत सरकारने राबवलेल्या योजनांचा बोजवारा उडला आहे याबाबत अनेकदा तक्रार करूनही त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. मुबलक पाणीसाठा असूनही ग्रामपंचायतच्या बेजबाबदारपणामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागत आहे तरी याबाबत जिल्हा प्रशनाने लक्ष देऊन कारवाई करावी.
गावात सध्या या पाण्यावरच जनतेला अवलंबून रहावे लागते, जनावरांसाठी, पिण्यासाठी घरगुती वापरासाठी याच पाण्याचा वापर करावा लागतो, परंतू ग्राम पंचायतच्या नियोजनाअभावी जनतेला पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे … तरी संबधित खात्याने याकडे लक्ष देऊन पाणी टंचाई दूर करावी अशी मागणी होत आहे…
Belgaum Varta Belgaum Varta