सावगाव : बेळगाव तालुक्यातील सावगाव येथील प्रगतशील शेतकरी जयवंत बाळू कल्लेहोळकर यांच्या शेतात आज दिनांक 23 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी ते गेले आणि आग विझवताना त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, दोन बहिणी, भावजय, पुतणे असा परिवार आहे. आज रात्री 9 वाजता सावगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. उद्या सकाळी 8 वाजता रक्षाविसर्जन आहे.
Belgaum Varta Belgaum Varta