मुंबई : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह सीमाभागातील मराठी जनतेला लवकरात लवकर महाराष्ट्रात सामावून घेऊन संयुक्त महाराष्ट्राचे अधुरे राहिलेले स्वप्न पुर्ण करून तेथील माझ्या मराठी बांधवांना न्याय मिळवून द्याव्या हीच खरी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शहीद झालेल्या हुतात्माना खरी श्रद्धांजली असेल. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत बेळगाव सीमा भागातील मराठी जनतेच्या तीन पिढ्या महाराष्ट्रात सामील होण्यासाठी लढा देत आहेत. कर्नाटक सरकारचा अन्याय सहन करत जगत आहेत. संयुक्त महाराष्ट्राची खरी चळवळ तर बेळगावातून सुरू झाली होती. ती चळवळ मुंबईत पेटली. मुंबई महाराष्ट्रात आली पण बेळगावसह सीमाभागातील मराठी जनता कर्नाटकात राहिली. हा त्याच्यावर झालेला अन्याय आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून तेथील तीन पिढ्या सतत संघर्ष करत, लढा देत जगत आहे.या लढयातील मीही एक सामान्य कार्यकर्ता आहे. तरी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र सीमा समन्वयक मंत्री यानी न्यायालयीन लढाई लवकर लढून बेळगावसह सीमाभागातील मराठी जनतेला न्याय देत, महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राचे अधुरे स्वप्न पुर्ण करावे व शहीद झालेल्या आपल्या बांधवांना खरी श्रद्धांजली व्हावी. बेळगावसह सीमाभागातील मराठी जनता महाराष्ट्रात सामील होण्यासाठी अतुर आहे. “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे… रहेगें तो महाराष्ट्र में, मरेगें तो महाराष्ट्र में..” अशा घोषणा माझें बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव देत लढा देत आहेत.. यांना लवकर न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही महाराष्ट्र सीमा समन्वयक मंत्री याना ‘बेळगाव कुणाच्या बापाचं..” पुस्तकाचे लेखक अर्जुन विष्णू जाधव यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे. झाली वीस वर्ष जाधव आपल्या लेखणीतून बेळगाव सीमा प्रश्नाना संदर्भात आवाज उठवत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta