
बेळगाव : शहापूर नाथ पै सर्कल येथे काल एका तरुणाने प्रेयसीची हत्या करून आत्महत्या केल्याच्या घटनेसंदर्भात आज तरुणाच्या कुटुंबीयांनी शवागारासमोर आंदोलन केले. आमच्या तरुणाने आत्महत्या केलेली नाही. त्याची हत्या केल्याचा आरोप येळ्ळूर येथील कुंडेकर कुटुंबियानी केला आहे.
शहापूर नाथ पै सर्कलमध्ये काल संध्याकाळी नवी गल्ली येथील ऐश्वर्या महेश लोहार (18) हिची हत्या करून येळ्ळूर येथील प्रशांत यल्लाप्पा कुंडेकर (29) याने स्वतःवर चाकूने वार करून घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मात्र, आज तरुणाच्या कुटुंबीयांनी बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या शवागारासमोर निदर्शने करत आपल्या मुलाचा खून केल्याचा आरोप केला.
कुटुंबियानी बोलताना सांगितले की, प्रशांतला फोन करून बोलावून घेतले होते. त्यामुळे आम्हाला प्रशांतची हत्या करण्यात आली असल्याचा संशय येत आहे.
पोलिस आयुक्त याडा मार्टिन म्हणाले की, शहापूर पोलिस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून तपासानंतरच सत्य बाहेर येईल.
Belgaum Varta Belgaum Varta