
चिरमुरी : घर हे आपलं पहिलं संस्काराचे केंद्र आहे. शाळा हे ज्ञान मंदिर. पहिला मान आईवडील यांचा आहे शिक्षक हे आपणास पुस्तकी ज्ञान देऊन समृद्ध करतात तर आईवडील अनुभव शिकवतात. दोघाचंही स्थान तेवढंच महत्त्वाचं आहे सत्य हे जीवनात आत्मविश्वास निर्माण करतं. प्रामाणिकपणा आयुष्यात उभारी देत. छंद जोपासा, खेळ खेळा नेहमी आनंदी राहा पुस्तके वाचा मोठ्यांचा आदर करा शिक्षणातून माणूस घडविला जातो चिंता करू नका हसतमुखाने प्रेमळ स्वभावाने माणसं जिंका. जो इतरांशी गोड संयमाने, नातं टिकवतो तो जीवनात यशस्वी होतो. ज्या शाळेने मोठं केलं, लाल मातीचे ऋण फेडण्यासाठी सर्वकाळ स्मरणात ठेवा गुरू जनांची शिकवण एक शिदोरी आहे. असे मौलिक विचार प्रमुख वक्ते म्हणून वाय. पी. नाईक यांनी चिरमुरी प्राथमिक शाळेत सातवी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
फोटो पूजन मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून केले.
दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करुन रंगत आणली.
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पी. एम. पन्हाळकर यांनी करून प्रशालेत राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा आढावा घेतला. विद्यार्थाच्या कला गुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी सर्व शिक्षक वेळ देतात म्हणून पहिलीतील मुलं -मुली पंचवीस पर्यंतचे पाढे तोंड पाठ आहेत एक आदर्श शाळा म्हणून पाहिले जाते हा अभिमान वाटतो अशा शब्दांत विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष नागेश बेळगावकर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी वर्षभरात अभ्यास, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, वागणुक अशा विविध उपक्रमांतर्गत भाग घेऊन योग्य दोन विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कु.गौतम बेळगावकर, आदिती डोंबले हे आदर्श विद्यार्थी
यावेळी कु.आराध्य तंगणकर, वैभवी बेळगुंदकर, आदिती बेळगावकर, पुष्पा कणबरकर, आरोसी बेळगावकर आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
विशेष म्हणजे या शाळेत दुसरी, चौथीचे विद्यार्थी सहजपणे तीस पर्यंत पाढे तोंड पाठ आहेत. विशेष गुलाब पुष्प देऊन कौतुक केले.
एकीकडे मराठी शाळा गुणवत्ता नाही असा सूर आळवला जातो पण ही शाळा दर्जेदार असल्याचे सिद्ध झाले त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पुरस्कार निवृत्त शिक्षक वाय पी नाईक यांनी सर्व शिक्षक पालक विद्यार्थी यांना धन्यवाद दिले.
प्रा. पी. व्ही. नाकाडी तुडये महाविद्यालयचे यांनी संस्कारक्षम गोष्टी सांगून मार्गदर्शन केले.सौ चित्रा मुंगुरवाडकर यांनीही भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपाध्यक्षा सौ. गौरी जाधव, मारुती बेळगुंदकर, ग्रंथ पाल नितीन जाधव, पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ. आशा गावडे, आभार मंगल मिलके यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta