बेळगाव : श्री चांगळेश्वरी हायस्कूल येथे एस.एस.एल.सी. व सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न तसेच राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
सुरुवातीला संस्थेचे दिवंगत सचिव के. बी. निलजकर सर यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष वाय. एन. मजुकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला हार घालून अभिवादन करण्यात आले.
सकाळच्या सत्रामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यावेळी विद्यार्थ्यांनी विज्ञान गीत सादर करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान वस्तू प्रदर्शन तसेच विज्ञान आकृत्या रांगोळीच्या स्वरूपामध्ये दर्शविले. यावेळी ए. बी. कांबळे मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन विज्ञान शिक्षक वाय. बी. कंग्राळकर यांनी केले.
दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येकामध्ये खूप क्षमता असतात वेगवेगळे गुण असतात त्या क्षमतांचा वापर करून यशस्वी व्हा, आयुष्याचे वेळापत्रक ठरवा कष्ट व संघर्षाची तयारी ठेवा, कोणतीही गोष्ट सहज मिळत नाही, असे उद्गार प्रमुख वक्ते निवृत्त मुख्याध्यापक प्रताप सिंग चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उद्योजक श्रीराम बिल्डर्सचे मालक गोविंद टक्केकर म्हणाले की, आयुष्यात पुढील ध्येय निश्चित ठरवा, आवडीनुसार क्षेत्र निवडा उद्योग क्षेत्रात सुद्धा खूप संधी आहेत प्रॅक्टिकल ज्ञान मिळवा 18 ते 25 हे वय महत्त्वाचे आहे त्याचा सकारात्मक वापर करा मात्र आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर समाजसेवा करा.
यानंतर अध्यक्ष भाषणात श्री. वाय. एन. मजुकर सर म्हणाले की, आपण आभ्यासत कमी आहात असे समजू नका तुम्ही सर्वजण कर्तुत्वान आहात योग्य पद्धतीने अभ्यास करा व यशस्वी व्हा त्याचबरोबर संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर म्हणाले की, अपयश आले म्हणून घाबरू नका धैर्याने परीक्षेला सामोरे जावा.
या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली प्रास्ताविक मुख्याध्यापक ए. डी. धामणेकर यांनी केले. यावेळी बालोद्यान ते दहावीपर्यंतच्या गुणवान व क्रीडा स्पर्धा मध्ये तसेच शालेय विविध विद्यार्थ्यांचा गुरुवर्य वाय.एन. मजुकर फाउंडेशनच्या वतीने विजेत्यांना स्मृतीचिन्ह शालोपयोगी भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आले. 2024 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही फाउंडेशनच्या वतीने रोख रक्कम देवून तसेच शुभम नांदवडेकर यांच्या एस. एन. फाउंडेशनच्या वतीने स्मृतीचिन्हे देवून गौरव करण्यात आले.
उद्योजक गोविंद टक्केकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गुणात्मक शिक्षण देण्यासाठी प्रोजेक्टर भेट म्हणून दिले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष दौलत अण्णा कुगजी, माजी मुख्याध्यापक के. एल. हुंदरे सर, ग्रामपंचायत सदस्य जोतिबा चौगुले, समाजसेवक शुभम नांदवडेकर, संस्थेच्या संचालिका सौ. कांचन मजुकर, सौ. सुवर्णा जाधव, मनोज बेकवाडकर, सुधीर लोहार, रामदास धुळजी, गणपती राघोचे, शिक्षणप्रेमी यल्लूप्पा पाटील व प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक आय. बी. राऊत हायस्कूलचा संपूर्ण शिक्षक वर्ग व प्रायमरी शाळेचा संपूर्ण शिक्षक वर्ग तसेच आजी माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. कांबळे यांनी केले तर आभार विद्यार्थिनी अनोखी घाडीने मांडले.
यानंतर ठीक सात वाजता सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. याचे उद्घाटन पालक उज्वला यरमाळकर, रेणुका मेलगे, दीपा कुगजी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाल यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचे विद्यार्थी विद्यार्थिनींचे व पालक वर्गाचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta