बेळगाव : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगावच्यावतीने आयोजित कर्तव्यदक्ष महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
सदर समारंभास क्लबचे अध्यक्ष रो. विनयकुमार बाळीकाई, सचिव रो. लतेश पोरवाल, व्यावसायिक सेवा संचालक रो. सोमनाथ कुडचिकर, आरसीवी क्लबच्या अध्यक्षा शीला शशिकांत पाटील आणि स्वाती राहुल अंबेवाडी उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचे समाजातील योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. शहर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा स्मृतीचिन्ह आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये महिला सफाई कर्मचारी कल्पना संतोष तळिमानी (15 वर्षांपासून कार्यरत), प्रिमा अर्जुन कोळकर (22 वर्षांपासून कार्यरत) आणि लक्ष्मी विजय कांबळे (20 वर्षांपासून कार्यरत) यांचा समावेश होता. महिला दिनाच्या निमित्ताने या सफाई कर्मचाऱ्यांच्या अमूल्य योगदानाला सलाम करत रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामने त्यांना सन्मानित केले.
Belgaum Varta Belgaum Varta