बेळगाव : भारत विकास परिषदेतर्फे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ शनिवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बेळगावमधील तीन कर्तबगार महिला डॉ. माधुरी हेब्बाळकर, नाट्यकर्मी पद्मा कुलकर्णी व प्राचार्या नीशा राजेंद्रन यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
प्रारंभी अक्षता मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् प्रस्तुत केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पांडुरंग नायक यांनी भारत विकास परिषदेची ध्येयधोरणे स्पष्ट केली. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी सत्कारमूर्तींची ओळख करून दिली. सत्काराला उत्तर देताना डॉ. माधुरी हेब्बाळकर, पद्मा कुलकर्णी व नीशा राजेंद्रन यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपली मनोगते व्यक्त केली.
दुसऱ्या सत्रात महिलांसाठी खास आकर्षण “होम मिनिस्टर” खेळांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सर्व महिलांनी हिरिरीने सहभागी होऊन आनंद लुटला. विनायक मोरे यांनी स्पर्धेचे नेटके संयोजन केले. ज्योत्स्ना गिलबिले यांनी अखेर स्पर्धा जिंकून होम मिनिस्टरचा बहुमान मिळविला. त्यांना सुंदर अशी साडी देऊन अतिथिंच्या हस्ते गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन प्रा. अरुणा नाईक यांनी केले. जया नायक यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. यावेळी उषा देशपांडे, उमा यलबुर्गी, शुभांगी मिराशी, लक्ष्मी तिगडी, योगिता हिरेमठ, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, तृप्ती देसाई, नंदिनी पाटील, कांचन कलघटगी, नंदिता गिलबिले, अनिता हिडदुग्गी, शालिनी नायक, अमिता केकरे, प्राचार्य व्ही. एन. जोशी, एन. बी. देशपांडे, डॉ. व्ही. बी. यलबुर्गी, डॉ. अरविंद कुलकर्णी, विनायक घोडेकर, डी. वाय. पाटील, सुभाष मिराशी, विजयेंद्र गुडी, रामचंद्र तिगडी, जयंत जोशी, विनोद देशपांडे, किशोर काकडे, शुभकांत कलघटगी, ॲड. सचिन जवळी, पी. जे. घाडी, विजय हिडदुग्गी आदि उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta