Tuesday , December 9 2025
Breaking News

नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

Spread the love

 

येळ्ळूर : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथील सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 127 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. टी. वाय. भोगण सर यांच्या शुभहस्ते झाले.
तदनंतर समाज विज्ञान विषयतज्ञ श्री. एम. पी. कंग्राळकर यांनी आपल्या भाषणातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या समाज सुधारणा, शिक्षण आणि लेखन या क्षेत्रात मोलाचे काम केले आहे. म्हणूनच त्यांना भारतीय नारी आंदोलनाची जननी म्हटले जाते. जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीसे करण्यासाठी त्यांनी काम केले. फुले यांनी विधवांचे होणारे केशव पण थांबविण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला होता. त्या एक उत्तम लेखिका देखील होत्या असे उदगार काढले.
त्यानंतर आदरणीय मुख्याध्यापक श्री. टी. वाय. भोगण सर यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपातून सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या धैर्याने आणि अविचल इच्छेने स्त्री शिक्षणाच्या संदर्भात नवजागरणाचा पाया रचला, ज्यांनी आजपर्यंत स्त्रियांच्या अस्तित्वाची कल्पना केली होती. त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण बदल कसा घडवून आला याचे विवेचन केले.
सदर कार्यक्रमाला नेताजी हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जे. जे. पाटील सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती रेखा कंग्राळकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *