बेळगाव : नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर या संस्थेतर्फे उभारलेल्या ‘नवहिंद भवन’ या बहुउद्देशीय नूतन वास्तुचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. 2 मार्च 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजीराव सायनेकर राहणार असून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या हस्ते भवनाचे उद्धघाटन केले जाणार आहे.
कार्यक्रमाला पाहुणे म्हणून को – ऑप. सोसायटी बेळगावचे जॉईंट रजिस्ट्रार जी. एम. पाटील, उद्योजक सुधीर दरेकर, येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतिश पाटील यांना निमंत्रित करण्यात आले आहे.