बेळगाव : अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर सर्कल येथील माहेश्वरी अंध शाळेत रंगपंचमी साजरी करण्यात आली. संपुर्ण बेळगावात सर्वच जण या उत्सवाचा आनंद घेतात, पण ज्यांनी हे जगच पहिले नाही, अशा विद्यार्थ्यासमवेत दरवर्षी प्रमाणे या वर्षीची माहेश्वरी अंधशाळेत रंगपंचमी साजरी करीत आहोत, असे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी सांगितले.
माजी अध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांनी त्यांना कोणता रंग आहे माहीत नसलं तरी रंगपंचमी खेळत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जातो असे सांगितले.
यावेळी अंध विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
अध्यक्ष यल्लाप्पा पाटील फेडरेशन संचालक संजय पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मणराव शिंदे, अरुण काळे, खजिनदार मधु बेळगावकर, माजी अध्यश मदन बामणे, डॉ विनोदराव गायकवाड, विनोद आंबेवाडीकर, प्रदीप चव्हाण, आनंद कुलकर्णी, महेश शहापूरकर, महादेव होंगल, कुमार बेतुर, प्रकाश तांजी, उमेश पाटील, सुनिल मुरकुटे, दिगंबर किल्लेकर, सुरेश पाटील इत्यादी जायंट्स मेनचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.