बेळगाव : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक आज शनिवारी पार पडली. महापौरपदी प्रभाग क्रमांक 41 चे नगरसेवक मंगेश पवार तर प्रभाग क्रमांक 44 च्या नगरसेविका वाणी जोशी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.
महत्वाचे म्हणजे महापौर आणि उपमहापौर दोन्हीही पदे शहराच्या दक्षिण मतदारसंघाला प्राप्त झाली आहेत. यावरून पुन्हा एकदा आमदार अभय पाटील यांचे महापालिकेवरील वर्चस्व सिद्ध झाले आहे.