बेळगाव (प्रतिनिधी) : काँग्रेस रोड येथील मिलिटरी महादेव मंदिरात शेजारी असलेल्या शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला आज सोमवारी फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला शिवजयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
अभिषेक, शिवजन्मोत्सव आणि महाराजांच्या गळ्यात मोत्यांचा कंठ ही माळ, प्रमुख पाहुणे एम. एल. आय. आर. ही. चे ब्रिगेडियर जॉय दीप मुखर्जी, शिरीष गोगटे यांच्या हस्ते अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी गोगटे समूहाचे सदस्य शिरीष गोगटे यांनी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी डेप्युटी कमांडंट रामनाथकर, अविनाश पोतदार, दीपक पवार, अजित गरगट्टी, अजित सिद्धण्णावर, डॉ. हेरवाडकर, डॉ. नवीन, डॉ. समीर पोटे, संग्राम पाटील, दिनेश पतकी, प्रभाकर हलगेकर, राजू जाधव, सीए सुरेंद्र बारगांवकर ,राजू ,आदी मान्यवर उपस्थित होते.