बेळगाव : 5 मार्च 2025 रोजी बेळगावमध्ये पार पडलेल्या रॉ फिटनेस स्टुडिओ आयोजित जिल्हास्तरीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी मुंबईहून बेळगावला आलेले इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे सभासद व आंतरराष्ट्रीय पंच श्री. आशिष वर्तक यांच्या हस्ते इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनची मान्यता प्राप्त असलेले पत्र कर्नाटक बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि स्पोर्ट्सचे अध्यक्ष श्री. संजय सुंठकर व सचिव श्री. अनिल अंबरोळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले सदर पत्र हे मुंबईहून इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुरेश कदम यांनी पाठवले आहे. सदर मान्यता पत्र प्रदान करतेवेळी बसनगौडा पाटील, श्री. शिवाजी माने, श्री. किशोर गवस, श्री. नारायण चौगुले, श्री. रणजीत किल्लेकर, श्री. राजेश लोहार, श्री. जितेंद्र काकतीकर, श्री. सुनील चौधरी, श्री. सुनील बोकडे, श्री. बाबू पावशे, चेतन ताशिलदार आदी मान्यवर उपस्थित होते.