बेळगाव : बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ बालवीर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद गुरव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री सोमशेखर श्रीपाद सुतार (सीए), विज्ञान विकास मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुरेश कळेकर, तसेच बिजगर्णी ग्रा. पं. माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य मनोहर बेळगावकर उपस्थित होते .
प्रारंभी नववीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व स्फूर्ती गीत सादर केले. त्यानंतर अध्यक्ष प्रेमानंद गुरव व प्रमुख अतिथीच्या हस्ते कुंडीतील रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापिका मंगल पाटील यांनी प्रास्ताविकेतून शाळेचा व विद्यार्थ्यांचा पहिलीपासून दहावीपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला. त्यानंतर माजी मुख्याध्यापक के. डी. पाटील यांचा सदिच्छा सत्कार करण्यात आला. माध्यम श्रेष्ठ नसून गुणवत्ता हीच सर्वात श्रेष्ठ आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावं त्यात नक्कीच यश मिळेल असे उद्गार अध्यक्षांनी काढले. तसेच प्रमुख अतिथी सोमशेखर सुतार, सुरेश कळेकर, शंकर मासेकर, मनोहर बेळगावकर, डी. डी. बेळगावकर, संयोजक शंकर चौगुले, रश्मी पाटील आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मागील एस एस एल सी परीक्षेमध्ये इंग्रजी विषयात केंद्रात 99 टक्के गुण घेऊन प्रथम आलेल्या स्नेहल भास्कर, स्नेहल दळवी, समृद्धी पाटील या बालवीरच्या तिन्ही विद्यार्थिनींचा शंकर मासेकर सर यांनी रोख रक्कम देऊन गौरव केला. तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी येत्या दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक बक्षिसे देण्याचे जाहीर करून शुभेच्छा दिल्या. अतिथींचे स्वागत व ओळख सिद्धेश्वर तुर्केवाडकर यांनी करून दिले. यावेळी व्यासपीठावर सेक्रेटरी परशराम हदगल, आप्पा जाधव, राजू मुजावर, सुभाष हदगल, दशरथ पाऊसकर, जयकुमार गुरव, अर्जुन चौगुले, विनोद निकम, पुंडलिक सुतार, नागोजी नाकाडी, धाकलू पाटील, रिता बेळगावकर, रेणुका सुतार, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील, सुनील जाधव उपस्थित होते कार्यक्रमाला शाळेचा सर्व शिक्षकवृंद नववीचे विद्यार्थी व इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका भाग्यश्री कदम यांनी केले तर आभार नीता यल्लारी यांनी मानले.