बेळगाव : अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळ गणेशपूर यांच्या वतीने महिला दिन व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षण समन्वयक गौरी आकाश चौगुले- ओऊळकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात गौरी चौगुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा दीपा हंगीरगेकर, ग्रामपंचायत सदस्या रेणू गावडे, मंडळाच्या उपाध्यक्ष ज्योती कडोलकर, सेक्रेटरी गंगा चव्हाण उपस्थित होते. गौरी चौगुले यांनी आपल्या भाषणांमधून महिलांचे आरोग्य, पालकत्व आणि आपली जबाबदारी, त्याचबरोबर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महिलांचे सद्यस्थितीतील योगदान. याबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी समाजातील प्रत्येक कार्यात आपला सहभाग नोंदवावा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रश्मी गुरव यांनी केले व स्वागत वर्षा कम्मार यांनी केले. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी अनिता निंबाळकर, सीमा साळीक, मिलन मुचंडी, नंदा बसरीकट्टी, मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सर्व महिलांनी हळदी कुंकू समारंभात सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समीना सावंत यांनी मानले.