बेळगाव : महाड चवदार तलाव सत्याग्रहाच्या स्मृतीप्रित्यर्थ कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद यांच्यावतीने 20 मार्च रोजी शोषितांचा संघर्ष दिन पाळला जाणार आहे. समितीचे राज्यकोषाध्यक्ष सिद्धप्पा कांबळे यांनी ही माहिती दिली आहे.
यावेळी दलित नेते मल्लेश चौगुले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बेळगाव शहरात बोलविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सिद्धता कांबळे म्हणाले, कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद, राज्य प्रधान संचालक मावळळी शंकर यांच्या आदेशावरून राज्यभरात दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद यांच्या वतीने 20 मार्च रोजी महाड चवदार तलाव सत्याग्रहाच्या स्मृतीप्रित्यर्थसुशीतांचा शोषितांचा संघर्ष दिन पाळला जाणार आहे.
बेळगावमधील डॉक्टर आंबेडकर उद्यानमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख रवींद्र गडादी उपस्थित राहणार आहेत. विचारवंत भीमपुत्र बी. संतोष, प्राध्यापक डी. श्रीकांत व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. आर. जी. कांबळे, शशी नाळवे, नागेश कामशेट्टी, मनोहर अज्जनकट्टी, मल्लेश चौगुले, भाऊराव गडकरी, आनंद सदरीमनी यासह अन्य मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.