बेळगाव : पियूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षा संपल्या आणि परीक्षार्थीनी परीक्षा केंद्रा बाहेर पडताना एकच जल्लोष केला.
एक दुसऱ्यावर रंग उधळून आणि एक दुसऱ्याच्या गणवेशावर पेनने स्वाक्षऱ्या करून एकमेकांचा निरोप घेतला.
पियूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षा आज संपल्यामुळे परीक्षा केंद्रातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. वडगाव आणि शहापूर भागातील रंगपंचमी बुधवारी होत आहे मात्र बारावीची परीक्षा देऊन केंद्र बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी एक दुसऱ्यावर रंगांची उधळण करीत आदल्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली. काहींनी एक दुसऱ्याच्या गणवेशावर परीक्षेची आठवण म्हणून स्वाक्षऱ्या केल्या. हस्तांदोलन करून विद्यार्थी एक दुसऱ्याला निरोप देताना पहावयास मिळत होते. शहरातील विविध महाविद्यालयांतील परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.