
बेळगाव : जायंट्स मेन या सेवाभावी संघटनेचे ज्येष्ठ सभासद कैलासवासी तात्या रामचंद्र पवार यांचे चिरंजीव कैलासवासी चंद्रकांत पवार व नात कैलासवासी अवंती पवार यांच्या स्मरणार्थ दिव्यांग मुलांसाठी जलतरण शिबिराचे आयोजन केले होते त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी नाष्ट्याची सोय केलेली होती. संघटनेचे माजी संचालक श्री. विश्वास पवार यांनी जायंट्स ग्रुपच्या वतीने गोवावेस येथील जलतरण पुलावर संध्याकाळी साडेसहा वाजता या प्रोजेक्टचे आयोजन केले होते यावेळी जायंट्सचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या जलतरण शिबिरामध्ये 50 जणांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. या वेळेला दिव्यांग जलतरणपटूना कशा पद्धतीने जलतरण प्रशिक्षण दिले जाते याचे प्रात्यक्षिक उपस्थित सभासदांनी पाहून प्रशिक्षणार्थी व जलतरण प्रशिक्षक यांचे कौतुक केले. उपस्थित जलतरणपटू व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना डॉ. विनोद गायकवाड यांनी संयम जिद्द व चिकाटी जोपासल्यास दिव्यांग देखील उच्च पातळीवर चमकु शकतात फक्त त्यांना मार्गदर्शनाची नितांत जरुरी असल्याबद्दल आपले मत व्यक्त केले. यानंतर जायंट्स मेनचे जेष्ठ सदस्य श्री. मोहन कारेकर यांनी आबा स्पोर्ट्स क्लबने घेतलेल्या या उपक्रमाबद्दल प्रशंसा करून समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित आरएसएसचे श्री. राघवेंद्र कागवाड यांनी दिव्यांग मुलांच्या पालकांना आपल्या पाल्यांना खूप प्रेम देऊन त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी ऐकून घेऊन समजावून घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जायंट्स मेनचे सेक्रेटरी श्री. मुकुंद महागावकर, उपाध्यक्ष श्री. लक्ष्मण शिंदे, उपाध्यक्ष श्री. अरुण काळे, डॉ. विनोद गायकवाड, श्री. मोहन कारेकर, शिवराज पाटील, अविनाश पाटील, सुनील भोसले, प्रदीप चव्हाण, महादेव केसरकर, अशोक, प्रताप पवार, श्री. अशोक शिंत्रे, परशराम मंगनाईक उपस्थित होते. या वेळेला जलतरणपटूंना जायंट्स ग्रुपतर्फे अल्पोपहार देण्यात आला. श्री. विश्वास पवार यांनी सर्वांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta