चिक्कोडी : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर रंग खेळून झाल्यावर विहिरीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना एकसंबा येथे घडली आहे.
वेदांत हिरेकोडी (वय 11) आणि मनोज कल्याणी (वय 9) अशी दुर्दैवी मृत मुलांची नावे आहेत. बुधवारी शहरातील रंगपंचमीनिमित्त रंग खेळणारी मुले विहिरीवर आंघोळ करण्यासाठी गेली असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.
मुलांच्या मृत्यूबद्दल पालकांचा आक्रोश शिगेला पोहोचला आहे, सदलगा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.