
बेळगाव : धर्मवीर संभाजीनगर वडगांव येथील श्री गणेश मंदिर ट्रस्ट, सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि महिला मंडळ यांच्यावतीने बेळगांवचे नवनिर्वाचित महापौर श्री. मंगेश नारायण पवार तसेच वार्ड क्र. 50 च्या नगरसेविका सौ. सारिका पाटील यांचा श्री गणेश मंदिराच्या सभागृहात रविवारी सायंकाळी जाहीर सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना श्री. मंगेश पवार यांनी कृतज्ञता व्यक्त करून आपले विचार मांडले. वार्डाच्या नगरसेविका सौ. सारिका पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. श्री गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. मारूती जायाण्णाचे यांच्या हस्ते महापौरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. श्री. विनायक मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्री गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मारुती जायाण्णाचे, उपाध्यक्ष भाऊराव पाटील, परशराम नावगेकर, विनायक मोरे, प्रसाद यळ्ळूरकर, गोकुळ अकनोजी, प्रदीप शट्टीबाचे, श्रीधर जाधव, सचिन बांदिवडेकर, महादेव मोरे, परशराम बगाडे, श्री गणेशोत्सव मंडळातर्फे विलास यळगुकर, अजय निंगाडे, अमृत खोराटे तसेच महिला मंडळातर्फे वैशाली जाधव, रेणूका पाटील, नीता चंदगडकर, प्रतिभा सडेकर यांनी महापौरांना तसेच नगरसेविका सौ. सारिका पाटील यांना सन्मानीत केले. यावेळी धर्मवीर संभाजीनगर येथील नागरिक तसेच महिला मंडळचे सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta