नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्ली येथे भेट घेतली आणि राज्यात सुरू असलेल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत दीर्घ चर्चा केली.
भेटीनंतर बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, राज्यातील राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांची गती वाढविण्याची विनंती केली आहे. शिराडी घाट बोगद्याच्या बांधकामासह राज्यातील विविध २० प्रकल्पांबाबत चर्चा केली असून मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक चर्चा केली.