बेळगाव : कन्नडधार्जिण्या पोडिओशी मराठी भाषेत बोलण्याचा आग्रह धरलेल्या किणये येथील तरुणाचा सत्कार केल्यामुळे पोटशूळ उठलेल्या कानडी संघटनांच्या दबावामुळे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्यावर माळमारुती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. आज शुभम शेळके यांना जामीन मंजूर झाला. त्यांची हिंडलगा कारागृहातून सुटका झाली.
यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, धनंजय पाटील, मनोहर हुंदरे, विजय जाधव, अशोक घगवे, नारायण मुचंडीकर, प्रवीण रेडेकर, भागोजी पाटील, राजू पाटील, अश्वजित चौधरी आदी उपस्थित होते.