बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील संपगाव आजूबाजूच्या मुतली परिसरात एका शेतात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. वन विभागाच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या नजरेत आहे. यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
संपगाव व पट्टीहाळ गावात बिबट्याने ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे. बिबट्याने संपगाव जवळ कुत्रा आणि कोल्ह्याची शिकार केल्याची माहिती समोर आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बसवलेल्या सीसी कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत.
बिबट्याला पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. वन अधिकाऱ्यांनी संपगाव आणि आसपासच्या लोकांना संध्याकाळच्यावेळी या परिसरात फिरु नका असे आवाहन केले आहे.