
बेळगाव : बेळगाव शहरातील खाडे बाजार येथील खंजर गल्ली येथे फूटपाथवर दुकान लावण्यावरून झालेल्या गदारोळाचे रूपांतर हाणामारीत झाले असून एका दुकानदाराने दुसऱ्या दुकानदाराचे नाक कापल्याची घटना घडली आहे.
पीडित सुफियान पठाण (४२) हे दुकान सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना, अयान देसाई या दुकानदाराशी बाचाबाची झाली. यावेळी देसाई यांनी चाकू काढून सुफियानचे नाक कापले.
या हाणामारीत समीर पठाण हा आणखी एक जण जखमी झाला. सुफियानवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta