Monday , December 8 2025
Breaking News

कोगनोळी येथे रेणुका यात्रा उत्साहात

Spread the love
कोगनोळी : येथील हणबरवाडी रोडवरील रेणुका मंदिरात रेणुका यात्रा उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिर परिसरात नारळ, साखर, कापूर, उदबत्ती, आईस्क्रीम, भेळ आदीसह अन्य दुकाने थाटण्यात आली होती.
प्रति वर्षी कोगनोळी येथील हजारो भाविक सौंदत्ती यल्लमा डोंगरावर यात्रेसाठी जाऊन आल्यानंतर त्याच दिवशी यात्रा भरली जाते. माघ पौर्णिमेला ही यात्रा जाणार होती पण काही कारणाने पुढे ढकलण्यात आली होती. गावातून दहा कर्नाटक बस गाड्या भरून भाविक यल्लमा रेणुकाच्या दर्शनासाठी गेले होते. बुधवार तारीख 2 रोजी दुपारी सर्व भाविक परत आले.
मानाचे जग मंदिराजवळ उतरण्यात आले होते. मंदिरामध्ये रेणुका मूर्तीची विधिवत पूजा करून जग पूजन करण्यात आले.
यावेळी योगेश चौगुले, राजगोंडा पाटील, बाळासाहेब रावळ, बाबासाहेब निकम, भाऊसाहेब टोपान पाटील, अशोक वंदूरे, नरसु टोपान पाटील, अनिल पाटील, बबलू पाटील, अर्जुन किस्के, रावसाहेब माने, भोजराज कोळी, प्रशांत पोवाडे, शिवाजी नाईक, अवि टोपान पाटील, भाऊसाहेब चिंचणे, सी के पाटील, नामदेव दाभाडे यांच्यासह मानकरी, ग्रामस्थ, भाविक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सरपंच चषक मोदगे येथे भव्य बैलगाडा पळवण्याची जंगी शर्यत

Spread the love  दड्डी : सरपंच चषक फौंडेशन, मोदगे, ता. हुक्केरी, जि. बेळगाव येथे भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *