
बेळगाव : शाळेच्या चार भिंतीत देशाचं भवितव्य घडत असतं. शिक्षित, सुसंस्कृत, राष्ट्राभिमानी नागरिक तयार करण्याचा कारखाना म्हणजे शाळा. म्हणून शाळा ही शाळेसारखी असली पाहिजे. तेथील वातावरण विद्यार्थ्यांना पूरक व पोषक असणं किंबहूना तशी सोय करण ही शिक्षक व पालकांची संयुक्त जबाबदारी आहे. मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच मनोरंजनासह हसत खेळत शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आधुनिक साधनांची शाळेला तितकीच आवश्यकता असते. हाच उद्देश लक्षात घेऊन गेले दोन महिने वर्गातील भित्तिचित्रे तयार करणे, वर्गात प्रोजेक्टर व टीव्ही असावा यासाठी शिक्षकांची धडपड चालू होती.
ही धडपड कामी आली आणि आज हे स्वप्न सत्यात अवतरलं. या कामी शिक्षकांनी घेतलेली मेहनत त्यांच्या शाळेविषयीच्या, विद्यार्थ्यां विषयीच्या तळमळीची साक्ष देतात. भित्तिचित्रे रंगवणारे शिक्षक श्री. अमृत गवस हे महिला विद्यालय येते शिक्षक म्हणून सेवा देताहेत. त्यामुळे शाळा सुटल्यावर 5.50 वाजता ते शाळा कामासाठी येतात त्यामुळे आपल्या शाळेचे शिक्षक त्यांच्यासोबत थांबून रोज रात्री दहा, साडेदहा पर्यंत हे काम करून घेत होते. पहिलीच्या वर्गाचे श्री. राहुल सर, कुरणे सर, तुषार सर यांनी घेललेली मेहनत व सोबतीला उदय पाटील सर यांचे सहकार्य घेऊन हे कार्य संपन्न झाल.
श्री. अमृत गवस यांनी एक शिक्षक म्हणून व आपली सामाजिक बांधिलकी म्हणून शाळेतील ही सुंदर अशी भित्तिचित्रे अतिशय अल्प दरात रंगवून दिली. शाळा त्यांची नेहमी कृतज्ञ राहील.
या कामासाठी देणगी दिलेल्या व टीव्ही, प्रोजेक्टर उपलब्ध करून दिलेल्या देणगीदारांची मनापासून कृतज्ञता.त्यांच्या सहकार्याशिवाय हे कार्य कठीण होत. इयत्ता दुसरी व तिसरीच्या वर्गाचे काम चालू आहे लवकरच तेही कार्य तडीस जाईल व आपल्या मुलांना सरकारी शाळेत घालणाऱ्या, मातृभाषेवर प्रेम करणाऱ्या पालकांच्या मुलांना याचा लाभ घेता येईल, शिक्षक म्हणून या सारखा दुसरा आनंद नाही….अर्थातच स्मार्ट क्लास मधील विद्यार्थी सुद्धा स्मार्ट असतील यांची काळजी नक्कीच घेऊ…
Belgaum Varta Belgaum Varta