बेळगाव : बसवन कुडची देवराज अर्स कॉलनी येथे मूलभूत सुविधा नसल्याने रहिवाशांना समस्या निर्माण झाली आहे. या ठिकाणी रोड पाण्याची व्यवस्था गटारी पथदीप यासह अनेक गोष्टींचा अभाव असल्याने नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
घरपट्टी पाणीपट्टी भरून देखील नागरिकांना वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे देवराज अर्स कॉलनीत मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली आहे.
बसवन कुडची देवराज अर्स कॉलनी येथे मेन रोड शेवटपर्यंत दोन्ही बाजूने पेव्हर्स उपलब्ध करून देण्याची मागणी तसेच परिसरातून बल्लारी नाल्यापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी आणि गटर तसेच ड्रेनेजची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याच बरोबर या ठिकाणी एक लाख लिटर क्षमतेची स्वतंत्र पाण्याची टाकी बांधून देण्याची मागणी देखील करण्यात आली असून स्मशान तलाव हॉस्पिटल या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
