
बेळगाव : कर्नाटक अधिवेशनाला प्रतिउत्तर म्हणून सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा घेण्यात येतो. २०१८ मध्ये झालेल्या महामेळाव्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सहा जणांवर दोषारोप ठेवण्यात आले होते. त्या संदर्भात जिल्हा सत्र न्यायालयाच्या चतुर्थ न्यायालयात खटला सुरू असून दिनांक ८ एप्रिल रोजी यासंदर्भात पोलिसांची साक्ष नोंदविण्यात आली. यावेळी २४ एप्रिल २०२५ ही पुढील तारीख देण्यात आली.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, मारुती मरगाणाचे आदी उपस्थित होते. समितीच्या वतीने ॲड महेश बिर्जे आणि ॲड वैभव कुट्रे काम पाहत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta