
बेळगाव : गेल्या तीन वर्षांपासून नराधम व अल्पवयीन मुलगी यांच्यात मैत्री होती. या मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उशिरा उघडकीस आली आहे.
बेळगाव येथील औरंगजेब (23) याचे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळख होती. ओळखीतून मैत्री झाली. नराधम वारंवार दारूच्या नशेत मुलीच्या घरात घुसून चाकूचा धाक दाखवायचा. चार दिवसांपूर्वी त्याने मित्राच्या मदतीने अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन तिला दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून पळ काढला.
या प्रकरणी आरोपीला मदत करणाऱ्या मित्राला पोलिसांनी अटक केली असून, फरार असलेल्या औरंगजेबचा शोध सुरू आहे. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta