
बेळगाव : गोव्यातील दारू साठा बेळगावात साठवून बेकायदेशीर मार्गाने विक्री करणाऱ्या आरोपीच्या घरावर बेळगाव पोलिसांनी छापा टाकून दारू जप्त करून आरोपीला अटक केली. शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अटक केलेल्या आरोपीचे नाव सुभाष सुधीर डे (४६ रा. महाद्वार रोड) असे आहे. त्याने शहापूर येथील हुलबत्ते कॉलनीतील पहिल्या क्रॉस प्लॉट क्रमांक ५३०२ येथील त्याच्या नातेवाईकांच्या घरी कोणताही परवाना न घेता बेकायदेशीरपणे दारू साठवली होती. गोव्यातून कमी किमतीत दारू खरेदी करून बेळगावात जास्त किमतीत विकण्याच्या उद्देशाने हा साठा करण्यात आला होता. गोवा राज्यातील विविध कंपन्यांमधील १,३७,६८१ रुपये किमतीचे ३१३.३ लिटर दारू, साठा करून ठेवण्यात आली होती, ती जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधार घेऊन शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग आणि पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.एस. सिमाणी यांच्या नेतृत्वाखाली सीएचसी नागराज ओसप्पागोळ, संदीप बगाडी, जगदीश हादिमनी, श्रीधर तळवार, श्रीशैल गोखावी, सुरेश लोकुरे, अजिता शिपुरे, सिद्धरामेश्वर मुगळखोटे, विजय कमते खोडे आदिंच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta