बेळगाव : बेळगाव जिल्हा भाजप कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती साजरी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर भाजपा कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी बेळगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री तसेच बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर तसेच खासदार श्री. विश्वेश्वर हेगडे कागेरी, भाजप प्रदेश चिटणीस श्री. पी. राजीव, माजी आमदार संजय पाटील, महांतेश दोडगौडर, श्री. यल्लेश कोलकार, संदीप देशपांडे, मल्लिकार्जुन मॅडमनावरन, श्री. श्री सद्गुरु मुरगावकर, श्री. गौडा पाटील, नितीन चौगुले, संतोष देशनूर, महेश मोहिते, चेतन अंगडी, राज्य भाजप महिला मोर्चा सचिव डॉक्टर सोनाली सरनोबत यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.