बेळगाव : बेळगाव शहरातील एका पोलीस हेडकॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. त्यापाठोपाठ 24 तासात जिल्ह्यातील आणखी एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण प्रचंड प्रमाणात वाढला असल्याची चर्चा होत आहे.
यल्लाप्पा भोज असे या कॉन्स्टेबल चे नाव आहे ते कुडची स्थानकामध्ये सेवेत होते. रविवारी रात्री अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्यावर यल्लप्पा भोज यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना तात्काळ महाराष्ट्रातील सांगली शहरातील भारती रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यल्लाप्पा भोज हे मूळचे मुडलगी तालुक्यातील तुक्कानट्टी येथील रहिवासी होते. कुडची शहरातील कुडाची चेकपोस्टवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना तैनात करण्यात आले होते. ते गेल्या ९ महिन्यांपासून कुडची पोलिस ठाण्यात ड्युटीवर होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, त्यांची पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.