बेळगाव : आदर्शनगर वडगाव येथील संजीवीनी फौंडेशनमध्ये घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शकुंतलाअम्मा यांच्याहस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर शोभा बखेडी यांनी पुष्पहार अर्पण केला.
चेअरमन मदन बामणे यांनी श्रीफळ वाढविले.
यावेळी उपस्थित साऱ्यांनी आंबेडकरांचा जयजयकार केला.
