बेळगाव : राज्यस्तरीय स्पर्धेसह भारतीय ऑलिम्पिक संघ व वर्ल्ड तायक्वांदोशी सलग्न इंडिया तायक्वांडो मार्फत आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय तायक्वांडो चॅम्पियनशिप उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल काकती येथील त्रिवेणी भावकांना भडकन्नवर हिला यक्षीत युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक व पंच श्रीपाद रवी राव यांनी रुपये 10 हजार रुपयांचे प्रोत्साहन धन देऊन नुकतेच सन्मानित केले.
नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय तायक्वांडो चॅम्पियनशिप स्पर्धेत महिलांच्या 49 किलो खालील वजनी गटात काकती येथील त्रिवेणी भावकांना भडकन्नवर कांस्य पदक पटकावून बेळगावच्या नावलौकिकात भर घातला आहे. यापूर्वी तिने कर्नाटक राज्य ऑलम्पिक महोत्सवातील राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेमध्ये बेळगाव जिल्ह्यासाठी रौप्य पदक मिळवले होते. एकंदर संपूर्ण वर्षभरात त्रिवेणी भडकन्नवर ही तायक्वांडो खेळामध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावत असल्याबद्दल तसेच तिने नुकतेच राष्ट्रीय स्तरावरील कांस्य पदक हस्तगत केल्याबद्दल यक्षीत युवा फाउंडेशनचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक व पंच, तायक्वांदो मास्टर श्रीपाद रवी राव यांनी संस्थेच्या मुख्यालयात त्रिवेणी हिला धनादेशाच्या स्वरूपात 10 हजार रुपयांचे प्रोत्साहन देऊन सन्मानित केले. यक्षीत युवा फाउंडेशनचे राव युवा अकॅडमीचे विद्यार्थींनी असणारी त्रिवेणी भडकन्नवर ही मागील 10 वर्षापासून तायक्वांदोचा सराव करत असून दोन वर्षांपूर्वी दक्षिण कोरियातील कुक्किवान येथे घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने 1 -डिग्री आंतरराष्ट्रीय ब्लॅक बेल्ट प्राप्त केला आहे हे विशेष होय.