Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक पोलिस ज्युडो क्लस्टर स्पर्धा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : नेहरूनगर, बेळगाव येथील डीवायईएस ज्युडो इनडोअर हॉल येथे आयोजित कर्नाटक पोलिस ज्युडो क्लस्टर स्पर्धा नुकतीच उत्साहात पार पडली.

डीवायईएस ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि भैरवी मुजुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बुधवारी 16 एप्रिल रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेतील यशस्वी स्पर्धक पुढीलप्रमाणे आहेत. पुरुष विभाग : 1) दरेप्पा एम.टी. (पोलीस कॉन्स्टेबल) 66 किलो गट प्रथम क्रमांक, 2) लिंगेश्वर एस (पोलीस कॉन्स्टेबल) 81 किलो गट प्रथम क्रमांक, 3) लिकिथ एस (पोलीस कॉन्स्टेबल) 90 किलो गट प्रथम क्रमांक, 4) अविनाश नाईक (पीएसआय) 100 किलो वरील गट प्रथम क्रमांक. महिला विभाग : 1) पार्वती अंबाली (पोलीस कॉन्स्टेबल) 70 किलो गट प्रथम क्रमांक, 2) त्रिवेणी कलाकुटगी (पीएसआय) 78 किलो गट प्रथम क्रमांक. सदर यशस्वी खेळाडू आता पुढील महिन्यात जम्मू आणि काश्मीर येथे होणाऱ्या ऑल इंडिया पोलिस गेम्स या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतील. उपरोक्त कर्नाटक पोलिस ज्युडो क्लस्टर स्पर्धेप्रसंगी 2-बटालियन केएसआरपीचे एसपी/कमांडंट रमेश बोरगावी, केएसआरपी पोलीस निरीक्षक ज्योती परांडे, केएसआरपी पोलीस निरीक्षक जी. जी. सिद्धरेड्डी आदी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *