बेळगाव : बेळगाव तालुक्यात होणाऱ्या रिंग रोडच्या विरोधात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर म्हणाले की, बेळगाव तालुक्यामध्ये होणाऱ्या रिंग रोड तालुक्यातील शेतकऱ्यांना मारक ठरणार आहे. यापूर्वीही रिंग रिंग रोड सरकारने नोटीफिकेशन काढून आपला प्रस्ताव ठेवला होता, या विरोधात बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल करून हा प्रस्ताव पडला होता.
परंतु परवाच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी बेळगाव भेटीच्या वेळी हा रिंग रोड होणार असल्याचे सूचित केले होते. या संदर्भात तालुक्यातील शेतकरी याला विरोध करणार आहेत, त्यासंदर्भात गावोगावी शेतकऱ्यांनी या संदर्भात आपली जमीन देणार नसल्याचे व तीव्र लढा देणार असल्याचे सूचित करीत आहेत. तसेच बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती या संदर्भात गावोगावी जनजागृती करून मोठा लढा उभारणार आहे. रिंग रोड झाला तर परिसरातील सुपीक जमिनीला मोठा धोका आहे. यामुळे बेळगाव तालुक्यातील सुपीक जमीन घटणार आहे. देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु सुपीक जमिनी या ना त्या कारणाने सरकार अनेक प्रकल्पासाठी घेत आहे. यामुळे सुपीक जमिनीचे व अन्नदान पिकाचे उत्पादन घटत आहे. यामुळे देशाचे फार मोठे नुकसान होत आहे. बेळगाव तालुक्यातील शेतीसंदर्भात मोठा धोका आहे तरी शेतकऱ्यांनी हा धोका हाणून पाडावा असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर, ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. श्याम पाटील, सुरेश राजूकर, माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे सचिव विलास घाडी, महादेव कंग्राळकर, पी. के. तरळे, आर. आय. पाटील, संजय पाटील, मनोर संताजी, अनिल पाटील, महादेव बिर्जे, पुंडलिक पावशे, रावजी पाटील, विनायक तरळू, शिवाजी कुत्रे, शंकर चौगुले, व अनेक महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta