बेळगांव : कोल्हापूर येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेचा 14 वर्षाखालील मुलींचा शालेय रवाना झाला आहे. कुरुक्षेत्र हरियाणा येथे नुकत्याच झालेल्या विद्याभारती अखिल भारतीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा शाळेने दक्षिण मध्य क्षेत्राचे प्रतिनिधित्व करताना पंजाबचा अंतिम लढतीत पराभव करीत या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. आता हा संघ विद्याभारतीचे प्रतिनिधित्व करीत 68 व्या राष्ट्रीय शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत भाग घेणार आहे. या संघात निधीशा दळवी, श्रेया लाटूकर, समीक्षा खन्नूरकर, कल्याणी हलगेकर, हर्षदा जाधव, समृद्धी खोकाटे, हर्षिता गवळी, अद्विता दळवी, समृद्धी घोरपडे, अनन्या रायबागकर, कृतिका हिरेमठ, भावना बेर्डे, हिंदवी शिंदे, सृष्टी सातेरी, कनिष्क हिरेमठ, आदिती सुरतेकर, सिंचना तिगडी या खेळाडूंचा या संघात समावेश आहे. या संघासमवेत शिक्षिका अनुराधापुरी अरुणा पुरोहित हे रवाना होत आहे. या संघाला विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, विद्या विकास संयोजक रेणुका, विद्याभारती प्रांत उमेश कुमारजी, व पालक वर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta