Wednesday , March 4 2026
Breaking News

राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी सेंट झेवियर्स स्कूल मुलींचा संघ रवाना

Spread the love

 

बेळगाव : कोल्हापूर येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने होणाऱ्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी कॅम्प मधील सेंट झेवियर्स इंग्रजी माध्यम स्कूलचा 14 वर्षाखालील मुलींचा शालेय फुटबॉल संघ आज गुरुवारी बेंगलोरहून रवाना झाला आहे. नुकत्याच मंगळूर येथे झालेल्या कर्नाटक राज्यस्तरीय 14 वर्षाखालील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक सह सुवर्णपदक आणि चषक पटकाविला होता. आता हा संघ संपूर्ण कर्नाटक राज्याचा प्रतिनिधित्व करीत 68 व्या राष्ट्रीय शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत भाग घेत आहे. या संघात मुलींच्या राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी 9 फुटबॉलपटूंची निवड झाली आहे. निवड झालेले फुटबॉलपटू पुढीलप्रमाणे कर्णधार जानवी चव्हाण, उम्मेहनी पठाण, मारिया मुजावर, अपेक्षा मत्तीकोप, सुदिक्षा मेहत्री, निधी नागोजीचे, मृणाल वर्पे, तेजल हंन्सी, प्रश्मिता देवदिगा या संघात समावेश आहे. सेंट झेवियर हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर सिरीयल बॅग्ज, क्रीडा शिक्षिका जुलेट फर्नांडिस, क्रीडा शिक्षक चेस्टर रोजारिओ यांचे आणि इतर शिक्षक व पालकांचे संघाला प्रोत्साहन तर फुटबॉल प्रशिक्षक ज्येष्ठ रवी शंकर मालशेट, मानस नायक यांचे कुशल मार्गदर्शन लाभत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेक्कीनकेरे येथे शेतकरी महिलेवर हल्ला; गावकऱ्यांचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरे येथे मंदिराच्या जागेत वैरण ठेवल्याच्या कारणावरून एका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *