बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनतर्फे पदवीपूर्व व पदवी आंतरमहाविद्यालयीन मि. बेनन स्मिथ शरीरसौष्ठव स्पर्धेत शुक्रवारी विनीत विवेक हणमशेठ या उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब पटकाविला. बेननस्मिथ मेथडिस्ट पदवी कॉलेजच्या मैदानावर आयोजित केली होती.
ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७० आणि ७० हून अधिक वजनी गटात घेण्यात आल्या. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध गटातील विजेत्यांना प्रत्येक गटातील विजेत्या स्पर्धकांना बेल्ट, पदक, चषक, प्रमाणपत्र, टी शर्ट व भेटवस्तू असे बक्षीस देण्यात आल्या.
५५ किलो-१) अजिंक्य शिंदे अंगडी इंजिनियर कॉलेज, २) विशाल सांजी ज्योती कॉलेज ३) मिथिलेश कोसंदल जैन कॉलेज ४) नागराज भागोजी एस जी बाळेकुंद्रे कॉलेज ५) मिथिलेश कोसंदळ ज्योती कॉलेज.
६० किलो- १) श्रीशिव मोदगेकर बीके कॉलेज २) कल्पेश कुंडेकर पोतदार कॉलेज ३) नील बांदेवडेकर आरपीडी कॉलेज ४) साहिल कळसर्णावर बनस्मित कॉलेज ५) खतीब तरडे शेख कॉलेज.
६५ किलो-१) स्वप्निल कपिलेश्वरी गोगटे कॉलेज २) अविनाश पाटील छत्रपती शिवाजी महाविद्यालय गजानन पाटील आरपीडी ३) स्वप्निल कपिलेश्वरी गोगटे कॉलेज ४) श्रीधर हांडे गोगटे कॉलेज ५) श्रीनिवास देसुरकर गोमटेश पॉलीटेक्निक.
७० किलो-१) विनीत हणमशेठ बी एस डी एम २) आदित्य सुळगेकर जैन कॉलेज ३) मोरेश देसाई गोगटे कॉलेज ४) श्रेयश भातकांडे गोगटे कॉलेज.
७० किलो वरील गट-१) श्याम राजगोळकर भरतेश हायस्कूल २) यश भोसले जैन कॉलेज ३) आदित्य सपकाळ आरपीडी ४) किशोर बेजगरकर रवी पाटील कॉलेज ५) हर्षद पाटील जैन कॉलेज
Belgaum Varta Belgaum Varta