बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव रविवारी अपूर्व उत्साहात जीजीसी सभागृहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून तसेच भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. पूर्णा प्रभू यांनी संपूर्ण वंदे मातरम् गायले. त्यानंतर शुभदायी गौरीदेवी पूजन करून महाआरती करण्यात आली.
भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर नवीन सदस्यांचे शपथग्रहण झाले. सचिव के. व्ही. प्रभू यांनी पुष्पगुच्छ देऊन नवीन सदस्यांचे स्वागत केले. स्वाती घोडेकर व रोहिणी पाटील यांनी चैत्रोत्सवाचे महत्त्व व महिमा सांगितला. अक्षता मोरे, रजनी गुर्जर, लक्ष्मी तिगडी यांनी सुश्राव्य भजने प्रस्तुत केली. त्यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम झाला. उषा देशपांडे आणि रोहिणी पाटील यांनी कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले. ज्योती प्रभू यांनी आभार मानले.
कार्यक्रमास जया नायक, शुभांगी मिराशी, प्रिया पाटील, लक्ष्मी तिगडी, पूजा पाटील, ॲड. बना कौजलगी, शालिनी नायक, गीता बागेवाडी, पांडुरंग नायक, प्रा. व्ही. एन्. जोशी, एन्. बी. देशपांडे, विनायक घोडेकर, सुहास गुर्जर, कुमार पाटील, सुभाष मिराशी, पी. एम्. पाटील, डी. वाय. पाटील, रामचंद्र तिगडी, व्ही. आर. गुडी, जयंत जोशी, मालतेश पाटील, पी. जे. घाडी, सुधन्व पुजार आदि उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta