
बेळगाव : जायंट्स ग्रुप बेळगांव परिवारतर्फे १ मे कामगार दिनाचे निमित्त साधून वॉर्ड क्रमांक २८ मधील महानगर पालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी उपमहापौर श्री. संजय शिंदे आणि लक्ष्मीरोड येथील ज्येष्ठ पांच काशिनाथ कडते हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वच्छ्ता कर्मचारी वॉर्डासोबतच बेळगाव स्वच्छ ठेवून आपले आरोग्य जपतात, बेळगावला सुंदर बनवतात त्याबद्दल त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी 12 कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
महानगरपालिका कर्मचारी श्याम चौगुले यांनी सत्कारमूर्तींच्या वतीने सत्कार केल्या बद्दल जायंट्स ग्रुपचे आभार व्यक्त केले.
अध्यक्ष सचिन केळवेकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. यावेळी जायंट्स वेलफेअर फाऊंडेशनचे उपाध्याक्ष श्रीधन मळीक, सचिव प्रवीण त्रिवेदी, जायंट्सचे उपाध्यक्ष तानाजी शिंदे, अभिषेक वाईंगडे, मयूर पाटील, नितीन केळवेकर, महागणपती युवक मंडळाचे उपाध्यक्ष दिपक सावळेकर आणि इतर सदस्य उपस्थित होते. तानाजी शिंदे यांनी आभार म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta