
बेळगाव : कर्नाटकाच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक आणि महान मानवतावादी, विश्वगुरु बसवण्णांच्या जयंतीनिमित्त उद्या ४ मे रोजी सायंकाळी ४ वाजता बेळगावात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. बसव जयंती उत्सव समितीने सर्व नागरिकांना या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बसव जयंती उत्सव समितीने केले आहे.
जगज्योती, मानवतावादी आणि सांस्कृतिक गुरू बसवण्णांची जयंती सर्व बसवपंथीय संघटनांनी एकत्र येऊन साजरी करण्याचा निर्धार केला आहे. राणी चन्नम्मा चौकातून सायंकाळी ४ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. ही मिरवणूक काकती वेस, गणपत गल्लीमार्गे, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, आणि कॉलेजरोड मार्गे मार्गस्थ होईल. विविध मठाधिपती, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या मिरवणुकीस प्रारंभ होईल, अशी माहिती ईरण्णा देयन्नावार यांनी इन न्यूजला दिली. शंकर गुडस बोलताना म्हणाले, बसवण्णांनी समानतेचा संदेश दिला असून, ते संपूर्ण जगाचे गुरू आहेत. त्यामुळे सर्वांनी या जयंती उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. रत्नप्रभा बेल्लद, मुरुघेंद्रगौड पाटील आणि बसवराज रोट्टी यांनीही यासंदर्भात माहिती दिली.
Belgaum Varta Belgaum Varta