
बेळगाव : 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारी सरस्वती मुलींची हायस्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि माजी विद्यार्थिनींचा पुनर्मिलन असा संयुक्त कार्यक्रम उद्या शनिवार दि. 10 व रविवार दि. 11 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
बेळगाव दक्षिणचे आमदार श्री. अभय पाटील यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने जुन्या शाळेच्या जागी नवीन इमारत उभारण्यात आली आहे.


शनिवार दि. 10 रोजी सरस्वती गर्ल्स हायस्कूल, शहापूर येथे बॅचनुसार माजी विद्यार्थिनींचा संवाद कार्यक्रम होणार आहे. त्यानुसार 2011 ते 2022 च्या बॅचमधील विद्यार्थिनींचा संवाद सकाळी 9:30 ते 11:00 पर्यंत, 2001 ते 2010 च्या बॅचमधील विद्यार्थिनींचा संवाद सकाळी 11:00 ते दुपारी 12:30 पर्यंत, 1991 ते 2000 च्या बॅचमधील विद्यार्थिनींचा संवाद दुपारी 12:30 ते 2:00 पर्यंत, 1981 ते 1990 च्या बॅचमधील विद्यार्थिनींचा संवाद दुपारी 2:30 ते 4:00 पर्यंत तसेच 1950 ते 1980 बॅच मधील विद्यार्थिनींचा संवाद दुपारी 4:00 ते 5:30 पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
त्यानंतर रविवार 11 मे 2025 रोजी सकाळी मुख्य कार्यक्रम होईल. सकाळी 8 ते 9.30 नाष्टा होईल. 9.30 ते 10 पर्यंत नवीन बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन, सकाळी 10:10 ते 11:00 वाजेपर्यंत सरस्वती हायस्कूल ते चिंतामणराव हायस्कूल पर्यंत पुनर्मिलन विद्यार्थिनींची शोभायात्रा, सकाळी 11:00 ते दुपारी 1:30 पर्यंत शिक्षकांचा सत्कार समारंभ, माजी विद्यार्थिनींकडून भावना व्यक्त आणि पाहुण्यांची भाषणे, जेवणाची वेळ : दुपारी 1:30 ते 2:30 पर्यंत, दुपारी 2:45 पासून सांस्कृतिक कार्यक्रम नंतर हाय टी. अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शतकोत्तर समिती, सरस्वती गर्ल्स हायस्कूलच्या मानद अध्यक्षा सुनीता हणमशेट व अध्यक्षा प्रीती कामत यांनी दिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta