२-३ दिवसांत मॉक ड्रील
बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरातील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत असून, येत्या २-३ दिवसांत मॉक ड्रील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज दिली.
आज देशातील युद्धसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बैठक घेतली होती. यानंतर माध्यमांना माहिती देताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले की, बेळगाव शहर आणि परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी अधिक खबरदारी घेऊन बंदोबस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहराच्या प्रत्येक सर्कलमध्ये सायरन बसवणे आणि मॉक ड्रील घेणे प्रस्तावित आहे. पोलीस आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने येत्या २-३ दिवसांत याची अंमलबजावणी केली जाईल. रुग्णालयांमध्येही आपत्कालीन परिस्थितीत कोणती पावले उचलावीत याबाबत जागरूकता निर्माण केली जाईल. उत्तर कन्नडमध्ये कैगा अणुऊर्जा प्रकल्प असल्याच्या पार्श्वभूमीवर ही माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
Belgaum Varta Belgaum Varta