
बेळगाव : सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क आयुक्तालयाच्या वतीने ‘फिट इंडिया’ अभियानांतर्गत बेळगावात सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.
बेळगावातील क्लब रोडवरील जीएसटी भवनापासून या सायकल मॅरेथॉनला बेळगाव आयुक्तालयाचे आयआरएस, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान आयुक्त समीर बजाज यांनी चालना दिली. ही सायकल रॅली राणी चन्नम्मा सर्कल, एम.जी. सर्कल आणि सीपीएड मैदानावरून मार्गक्रमण करत नागरिकांमध्ये जीएसटी आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल जनजागृती करण्यासाठी आयोजिण्यात आली होती.
यावेळी बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमशंकर गुळेद आणि बेळगाव डीजीजीआयचे अतिरिक्त डीजी अरोकिया राज उपस्थित होते. याव्यतिरिक्त, ३७ देशांमध्ये सायकल चालवलेल्या आणि नुकत्याच महिला सक्षमीकरणासाठी ‘मिशन माउंट एव्हरेस्ट क्राउड फंडिंग अभियान’ अंतर्गत भारतभर एकट्याने सायकल चालवण्यास सुरुवात केलेल्या प्रसिद्ध गिर्यारोहक समीरा खान यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांच्यासोबत विभागाचे अधिकारी, स्थानिक नागरिक आणि ‘वेणुग्राम सायक्लिंग क्लब’ तसेच ‘बेळगावी पेडलर्स क्लब’चे अनेक सायकलपटू सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta