
बेळगाव : शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत असलेला अंत्यविधी निवारा आज दुपारी झाड कोसळून संपूर्णतः कोसळला आहे. सदर घटनेच्या वेळी शेजारील निवाऱ्यात अंत्यविधी सुरू होते. मात्र नागरिक यावेळी दूर थांबलेले असल्यामुळे केवळ सुदैवानेच जीवित हानी टळली.
शहापूर स्मशानभूमीत 21 वर्षांपूर्वी मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळ आणि गौड सारस्वत ब्राह्मण समाज यांच्या वतीने स्मशानभूमीतील पहिला निवारा उभारण्यात आला होता. गेल्या तीन वर्षांपूर्वी या निवार्यावरील पत्रे बसविण्यात होते. मात्र हे पत्र पूर्णपणे गंजून गेले होते. संपूर्ण निवाराच धोक्याच्या स्थितीत उभा होता. अलीकडेच अवघ्या चार दिवसांपूर्वी मनपा आयुक्त शुभा यांनी स्मशानभूमीला भेट देऊन तेथील धोकादायक निवाऱ्याची पाहणी केली होती.
आज गुरुवारी दुपारी शेजारील निवाऱ्यात अंत्यविधी सुरू असताना नागरिकही उपस्थित होते. त्याचवेळी झाड कोसळून धोकादायक स्थितीतील निवारा कोसळला. अचानक कोसळलेल्या निवाऱ्यामुळे स्मशानभूमीत अंत्यविधीला उपस्थित नागरिकही भांबावून गेले. सध्या अर्धवट स्थितीत कोसळलेला निवारा पुर्णतः कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला ही धोका आहे. याची गंभीर दखल घेऊन महानगरपालिकेच्या वतीने तात्काळ या निवाऱ्याचे काम हाती घेण्यात येणे आवश्यक आहे.
Belgaum Varta Belgaum Varta