
बेळगाव : मॅजेस्टिक ग्रुपच्या वतीने टेलीकॉलर्स, कस्टमर सर्व्हिस ऑफिसर आणि कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदांसाठी २५ मे २०२५ रोजी होणाऱ्या मुलाखती (इंटरव्ह्यू) ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती कॉलेज रोड येथील हॉटेल सन्मान डिलक्समध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान घेण्यात येणार होत्या.
कंपनीतर्फे जारी केलेल्या माहितीनुसार, “काही अडचणींमुळे मुलाखतीची तारीख पुढे ढकलावी लागली आहे. नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल.” असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी नवीन तारीखेची प्रतीक्षा करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta